Share

खतांच्या किंमतीत घट पण शेतकऱ्यांच्या ‘या’ मागणीसाठी प्रहारच टाली थाली आंदोलन होणारच – कडू

Published On: 

अचलपूर : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती.

यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यासोबतच, भाजप मधील विविध नेत्यांनी देखील खत दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत अर्ध्याने कमी केली आहे.

खतांच्या किंमती जरी कमी केल्याची घोषणा केली असली तरी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहारच उद्या टाली थाली आंदोलन होणार असल्याची भूमिका घेतली आहे. ‘शेतकरीचा एकजुटीचा विजय, केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे. भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार. याकरीता प्रहारचे टाली थाली आंदोलन केंद्र शासनाच्या तुर, मुग, उडीद या धान्याच्या आयात धोरणावर उद्या होणार आहे,’ अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

‘केंद्र सरकार शेतकऱ्यांचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारभावात वाढ झाल्यानंतरही आम्ही जुन्याच दराने खत देण्याचं ठरवलं आहे. आजच्या निर्णयानंतर DAP खताची एक बॅग २४०० ऐवजी १२०० रुपयांमध्ये मिळेल,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!