मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या जन्मदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडत ‘बेरोजगारी दिवस’ साजरा केला’ एकीकडे भाजप नेत्यांनी मोदी सरकारच्या चांगल्या कामांचा तर दुसरीकडे काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारमुळे जनतेवर झालेल्या विपरीत परिणामांचा पाढाच वाचून दाखवला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या मनमोकळ्या ट्विट्स आणि वक्तव्यांमुळे अमृता फडणवीस या कायमच चर्चेत असतात. त्यांनी देखील नरेंद्र मोदींना खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपल्याला नरेंद्र मोदींच्या रूपाने – निर्णायक नेता, वैश्विक नेतृत्व, संकटमोचक, तारणहार असा नेता मिळवला आहे. चला त्यांना शुभेच्छा देऊया, संवेदनशील मनाचे कवी, नव्या भारताचे राष्ट्रपिता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच शब्दांच्या गीताने शुभेच्छा’ असं ट्विट करत सोबत स्वतःच्या आवाजातील गीत देखील अमृता फडणवीस यांनी शेअर केलं आहे.
हमने @narendramodi जी के रूप मे-
निर्णायक नेता पाया है
वैश्विक नेतृत्व देखा है
संकट मोचक पाया है
तारणहार देखा है
आओ बधाई देते है, संवेदनशील हृदय के कवि,नए भारत के राष्ट्रपिता,मा. नरेंद्र मोदीजी को उन्ही के लिखित शब्दों को गीत मे पिरोकर !
संगीत-श्री रूपकुमार रठोड#HappyBdayModiji pic.twitter.com/yWtsZXuq9O— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 17, 2021
काँग्रेसने साजरा केला बेरोजगारी दिवस
देशातील युवकांना दरवर्षी २ कोटी नवीन रोजगार देण्याचे खोटे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. हे अश्वासन त्यांनी पाळले नाही उलट अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून काँग्रेस कडून साजरा करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचा निषेध देखील करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचंय त्यांनी खुशाल यावे आणि भावी व्हावे-संजय राऊत
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- मित्रांसाठी नाही तर जनतेसाठी काम केलं असतं तर…; गांधींनी सांगितलं बेरोजगारी दिवसाचं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

