मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकारी असा उल्लेख केला आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले. या वक्तव्यानेच भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का? असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले आहेत. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान यावर आता शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. ‘ज्यांना कुणाला आमच्याबरोबर यायचं असेल त्यांनी यावं आणि भावी व्हावं. आजी सहकारी व्हावं. जे माजी आहेत ते आजी होतील. त्यामुळे तुम्ही त्याला भूकंप वगैरे म्हणू नका,’ असे मत राऊत यांनी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार
- भाजपसोबत युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान, तर मोदींना शुभेच्छा देताना म्हणाले…
- ‘विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात’, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया
- ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन
- ‘आजी, माजी आणि भावी सहकारी’ मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

