मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून आता पुन्हा एकदा पावसाचं दमदार कमबॅक होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
रविवारी पासून पुन्हा एकदा पाऊस होणार असून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये रविवारी वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. १९ सप्टेंबर म्हणजे रविवारपासून पुढचे तीन दिवस हे राज्यात पावसाचे असणार आहेत. या दिवसांमध्ये उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/0Sy8D1Ng4j— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 17, 2021
याबाबत हवामान खात्याचे ज्येष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केलं आहे. ‘IMD, ने आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्या नुसार राज्यात १९ सप्टेंबर-रविवार पासून पुढचे ३ दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल,’ असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचंय त्यांनी खुशाल यावे आणि भावी व्हावे-संजय राऊत
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- ‘उद्धवजी माझ्या कानात म्हणाले मुंबईला या, आपण बसू’
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांच्यावर काँग्रेसने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी


