Share

मित्रांसाठी नाही तर जनतेसाठी काम केलं असतं तर…; गांधींनी सांगितलं बेरोजगारी दिवसाचं कारण

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या जन्मदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडत ‘बेरोजगारी दिवस’ साजरा केला’ एकीकडे भाजप नेत्यांनी मोदी सरकारच्या चांगल्या कामांचा तर दुसरीकडे काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारमुळे जनतेवर झालेल्या विपरीत परिणामांचा पाढाच वाचून दाखवला.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करून मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘फक्त मित्रांसाठी नाही तर जनतेसाठी भाजपने काम केलं असतं तर बेरोजगारी दिवस साजरा करण्याची वेळ आली नसती,’ अशी टिपण्णी राहुल गांधी यांनी केली आहे.

देशातील युवकांना दरवर्षी २ कोटी नवीन रोजगार देण्याचे खोटे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. हे अश्वासन त्यांनी पाळले नाही उलट अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून काँग्रेसतर्फे साजरा करण्यात आला. ट्विटरवर देखील आज या हॅशटॅगची चांगलीच चर्चा रंगली होती.

बेरोजगारी उच्चांकावर – बाळासाहेब थोरात

महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘दरवर्षी २ कोटी नविन रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षाच्या सत्ताकाळात नविन रोजगार मिळणे तर दूरच आहे. अनेकांचे रोजगार जात आहेत. मोदी सरकारच्या गलथानपणामुळे बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.’ अशी टीका थोरात यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!