Share

‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’

Published On: 

औरंगाबाद : ‘मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी,’ असं विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिले. यासोबतच, येणारा काळच काय ते ठरवेल, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यामुळे भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून आता विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यासोबत एकत्र माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ‘सामान्य जनतेच्या हिताचाच मुख्यमंत्री ठाकरे निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी आहे,’ असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. या अटीवर दानवे यांनी प्रतिक्रिया देताना, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा असं प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे असं म्हटलं. मात्र भाजप काय भूमिका घेईल हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!