Share

दहा लाख रुपये आणले नाही म्हणून सासरच्यांनी महिलेला ढकलले विहिरीत!

Published On: 

जालना: भोकरदन तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे, प्लॉटिंग व्यवसाय करण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणले नाहीत म्हणून बुधवारी दुपारी सासरच्यांनी विवाहितेला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात विवाहीतेचा मृत्यू झाला आहे. ही घटना ठालेवाडी येथे घडली असून या प्रकरणी मयत महिलेचा पती, सासू व सासऱ्याविरुध्द भोकरदन पेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठालेवाडी येथील सुदाम ठाले यांचा विवाह ११ वर्षांपूर्वी तालुक्यातील वालसा डावरगाव येथील दैवशाला ऊर्फ आशाबाई वय २८ यांच्या सोबत झाला होता. विवाहांनतर तिला तीन मुली व एक मुलगा असे चार अपत्य आहे. मात्र, मागील एक वर्षांपासून दैवशाला हिला सासरकडील मंडळींनी माहेरहून प्लॉटिंगच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणत मागणी केली. त्यासाठी तिचा पती सुदाम ठाले, सासरा धोंडिबा ठाले व सासू लक्ष्मीबाई ठाले यांनी दैवशाला शारीरीक व मानसिक छळ करत होते. याबाबत दैवशालाने वेळोवेळी वडिलांना सांगितले होते. त्यानंतर मुलीला पाच लाख रुपये देतो म्हणून तिच्या वडिलांनी कबूल केले होते. व त्यासाठी जमिन विकल्याचा करारही केला होता, मात्र सासरच्यांनी ऐकले नाही. असा आरोपही विवाहितेचे वडील गणपत वाढेकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.

याच वादातून दुपारी एक वाजेच्या सुमारास दैवशाला हिस पती, सासू व सासरा यांनी संगनमत करुन त्यांच्या विहिरीत जीवे मारण्याच्या उद्देशाने लोटून दिल्याचे फिर्यादी वरून म्हटले आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून भोकरदन पोलिसांनी पती, सासू व सासरा या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!