औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये जबाबदार मंञी असतांना कोरोना काळात गर्दी जमवून विकास कामांचे उद्यघाटन करने भुमरेंना माहागातच पडले, न्यायलयात दाखल केलेला भुमरेंचा माफीनामा न्यायलयाने स्विकारला नाही, तर गर्दी जमवल्या प्रकरणी भुमरेंवर गुन्हा दाखल करा म्हणुन गोर्डे यांनी दाखल केलेला अर्ज न्यायलया फेटाळला माञ गोर्डेंना पोस्टेला जावून तक्रार दाखल करण्याची मुभा न्यायलयाने दिली आहे.
गेल्या ४ तारखेला राज्याचे रोहयो तथा फलउत्पादन मंञी यांनी कोरोनाच्या काळात कोव्हीड नियमांचे पालन न करता जमावबंदीचे आदेश आसतांना शासनाच्या आदेशाला न जुमानता मोठी गर्दी करुन विकास कामांची उद्यघाटने केल्याची तक्रार राकाॅंचे नेते दत्ता गोर्डे यांनी उपविभागीय पोलिस आधिकारी यांच्याकडे केली होती, या प्रकरणी प्रशासनाने भुमरे वगळता पाच जनांवर गुन्हा दाखल केला होता.
या विरुध्द दत्ता गोर्डे यांनी न्यायलयात याचिका दाखल करुन ना.भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, न्यायलयाने गोर्डे यांची मागणी फेटाळत त्यांना संबधीत ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मुभा दिली व तक्रार दाखल करुन न घेतल्यास पुन्हा न्यायलयात येण्याचे नमुद केले आहे, प्रारंभी ‘तो मी नव्हेच’ अशी भुमिका घेणारे भुमरे यांनी न्यायलयात माफीनामा सादर केला असता तो न्यायलयाने स्विकारला नाही, त्यामुळे ना.भुमरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू’, संजय राऊतांची टीका
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
- राशीद खान दुबईत करतोय मजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते…
- पहिल्याच दिवशी राधेचा धमाका ; दुबईत थिएटरबाहेर रांगा, तर…
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज मिळणार पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

