🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकांचे आवडते हिरो आहेत. १९ व्या शतकापासून त्यांनी मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. कलाविश्वामध्ये नाव कमावूनही बिग बी प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागतात. सध्या अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देत एक फोटो शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CP87TZthEbU/?utm_source=ig_web_copy_link
हा फोटो शेअर करत आधीच्या चाहत्यांमध्ये आणि आताच्या चाहत्यांमध्ये कसे बदल झाले आहे हे त्यांनी सांगितले आहे. अमिताभ यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या फोटोमध्ये ते त्यांच्या एका चाहतीला ऑटोग्राफ देताना दिसतं आहेत. त्यांच्या बाजूला शशि कपूर उभे आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘आता ते दिवस गेले जेव्हा चाहते मला अशा प्रकारे प्रेम आणि आदर करायचे. या मुलीकडे बघा… आभारी असल्याचे व्यक्त करतं आहे. आता फक्त इमोजी शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही भाग्यवान असाल तर…’ अमिताभ यांच्या या पोस्टवर चाहत्यांपासून सेलिब्रिटी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
