मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना हाताळण्याच्या उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, असं सांगण्यात आलं आहे. तर, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदी राज्य सरकारकचं कौतुक करत आहेत आणि फडणवीस मात्र टीका करत आहेत, असा टोला लगावलाय.
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता, पण ते प्रचारासाठी प.बंगालमध्ये गेल्यामुळे फोन घेतला नाही… हा दावा जितका खरा होता,
तितकेच पंतप्रधानांनी ठाकरे सरकारचे कौतुक केले, यात तथ्य आहे.????https://t.co/rsqI46U00B
via @mataonline: https://t.co/2vRlVYW2vH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 9, 2021
यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता, पण ते प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये गेल्यामुळे फोन घेतला नाही… हा दावा जितका खरा होता, तितकेच पंतप्रधानांनी ठाकरे सरकारचे कौतुक केले, यात तथ्य आहे,’ असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती…’; गडकरींचा प्रेमळ सल्ला
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘खट्याळ मुलं पण शांत होतात, पण यांचा थयथयाट थांबत नाही’


