मुंबई : मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
एकाबाजूला मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना हाताळण्याच्या उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. असे असताना उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघडीतील नेत्यांनी त्यांच्यावर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे. फडणवीसांच्या या शंकेला मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘खट्याळ मुलं पण कधीतरी शांत होतात. पण यांचा थयथयाट कायम सुरूच असतो. आमच्या कामाची उंची त्यांना सहन होत नाही. त्यामुळे त्यांना नेहमी पोटदुखी होते आहे. आम्ही जे करतोय ते जनता पाहत आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या कामाचं नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं असताना, महाराष्ट्रातील भाजपचे नेते स्वतः च्या पंतप्रधानांना देखील खोटं ठरवत आहेत का?,’ असा खोचक सवाल देखील किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आता देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती…’; गडकरींचा प्रेमळ सल्ला
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- पंढरपूरचं मैदान मारल्यानंतर आवताडे, परिचारक फडणवीसांच्या भेटीला


