नागपूर : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना आटोक्यात येण्यासाठी तसेच ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्सचा तुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एका ऑनलाईन बैठकीत माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सामान्य कार्यकर्त्यांना देखील एक प्रेमळ व खबरदारीचा सल्ला दिला आहे.
‘देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती आहे, योग्य काळजी घ्या. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत,’ असं भाष्य गडकरी यांनी बैठकीत केलं आहे.
‘राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नव्हे !’
‘आपल्या सेवाकामाचा मर्यादित प्रचार करणे ठीक आहे. मात्र, त्याचा फार बागुलबुवा करणं हे चूक आहे. एक ऑक्सिजन कोसंट्रेटर पुरवून चार जण फोटो काढतायत आणि वारंवार पसरावतायत, असं करू नका. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाहीये. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ आहे. नुसतं निवडणुका लढवून सत्तेत येणं हा त्याचा अर्थ नाही,’ असा मोलाचा सल्ला गडकरी यांनी दिला असून कोरोनाला गांभीर्याने घ्या. मला काही होणार नाही असं म्हणून हलगर्जीपणा करण्यापेक्षा योग्य काळजी घ्या, असे खडेबोल देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
महत्त्वाच्या बातम्या
- महावितरणने तयार केला विलगीकरण कक्ष! कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर होणार उपचार
- लोकांना भेटायला मी काय सरपंच आहे का ?, शिवसेना खासदाराचे बेताल वक्तव्य !
- ‘गडकरींकडे सूत्रे सोपवण्याची मागणी मोदींनी मान्य केली असती, तर ही वेळ आलीच नसती’
- ‘देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाच व्हिटॅमिन घेऊन अजून जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- पंढरपूरचं मैदान मारल्यानंतर आवताडे, परिचारक फडणवीसांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

