Share

‘माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे, ते बाहेर काढावं लागेल’

Published On: 

पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याने काढलेल्या रॅली प्रकरणात माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. आता पुण्यातील शिवाजी नगर न्यायलयाने संजय काकडे यांना जामीन मंजूर केला आहे. संजय काकडे यांना अटक केल्यानंतर काल पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायलयाने काकडे यांचा जामीन मंजूर केला आहे. शिवाजीनगर सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणूक आठ – नऊ महिन्यांवर आली आहे. आणि गेल्या निवडणुकीत मी केलेलं काम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच गजानन मारणे च्या रॅलीप्रकरणी मला अटक केली. मात्र, मला न्यायदेवतेवर विश्वास होता. न्यायदेवतेने अखेर मला न्याय दिला. परंतु, हे प्रकार त्यांनी थांबवावेत अन्यथा, माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे. ते बाहेर काढावं लागेल असा इशारा जामीन मिळाल्यानंतर काकडे यांनी दिला आहे.

काकडे म्हणाले, वास्तविक गजानन मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पुण्यात येण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीशी माझा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नाही. माझ्या गाड्या त्यात नव्हत्या. माझी माणसं नव्हती. कोणताही पुरावा नसताना केवळ राजकारण म्हणून याप्रकरणी मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. सेक्शन 41 अन्वये मला याप्रकरणात अटक करण्यापूर्वी नोटीस देणं कायद्याने अपेक्षित होतं. पोलीस मात्र कायद्यानुसार वागले नाहीत. मला नोटीस न देताच अटक केली.

काकडे म्हणाले, त्यांचा बोलावता धनी वेगळा आहे. जर त्यांनी पुरावे सादर केले तर, मी स्वतःहून पोलिसांना स्वाधीन होईल. परंतु, आज न्यायालयात गजानन मारणेची रॅलीतील गाड्या, सोशल मीडियावरील व्हिडिओ याविषयी काहीही पुरावे पोलीस सादर करू शकले नाहीत. त्यामुळे अखेर न्यायदेवतेसमोर पोलिसांचे म्हणणे टिकले नाही. मला न्याय मिळाला.

काकडे म्हणाले, तुम्हाला पुणे महापालिका जिंकायची असेल, तुमच्यात दम असेल तर, तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाऊन जिंका. परंतु, असं राजकारण करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा तुमचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. जनतेच्या, पुणेकरांच्या हृदयातून तुम्ही मला काढू शकत नाही. गेली 30 वर्षे मी व्यवसाय केला. या कालावधीत एकही तक्रार माझ्याविरोधात नाही. गेली सहा वर्षे राजकारणात काम करतोय. या कालावधीतही मी कोणाचंही नुकसान केलेले नाही. सध्या मी पुन्हा एकदा व्यवसायात लक्ष घातलं आहे. मी येणाऱ्या निवडणुकीत लक्ष घालणार किंवा नाही याविषयी मी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. तरीदेखील माझी प्रतिमा मलिन केली जात आहे. त्यांनी जर असेच प्रकार सुरू ठेवले तर, माझ्याकडे देखील त्यांच्याबाबत अनेक प्रकरणं आहेत. ती मला बाहेर काढावी लागतील असे देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!