मुंबई – केंद्रसरकारने नुकताच आपल्या देशातील विविध राज्यांना वाटप केलेला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या डाटा जाहीर केला असून त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या डाटामध्ये राज्याला फक्त २६ हजार इंजेक्शन्स देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.
#remdesivir ची दररोज महाराष्ट्र मधील मागणी 50000 ची
मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे
आता केंद्र सरकारनी ताब्यात घेतले आत्ता महाराष्ट्राला मिळणार 26000
महाराष्ट्राचा असा छळ कश्या साठी ?— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 21, 2021
रेमडेसिवीरची दररोज महाराष्ट्र मधील मागणी 50000 ची मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे आता केंद्र सरकारनी ताब्यात घेतले आत्ता महाराष्ट्राला मिळणार 26000. महाराष्ट्राचा असा छळ कश्या साठी ? असा सवाल उपस्थीत करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
राज्यात कोरोनाची गंभीर व भयावह परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने राज्याला दिवसाला २६ नव्हे तर ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जात आहे.आव्हाड यांच्या सोबतच मंत्री नवाब मलिक यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत आम्हाला प्रतिदिन केवळ ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स येत आहेत आणि आता नवीन वाटपानुसार, महाराष्ट्रात दररोज केवळ २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स प्राप्त होणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्रसरकार देत असलेला साठा अपुरा पडून अजून गंभीर समस्या निर्माण होणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे लग्न करू इच्छिणाऱ्या मंडळींची होणार पंचाईत, जाणून घ्या नवी नियमावली
- ‘माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे, ते बाहेर काढावं लागेल’
- राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक
- कोरोना अलर्ट! नांदेड जिल्ह्यात १३७२ नवे बाधीत, २५ जणांचा मृत्यू
- पॅट कमिन्सने चेन्नईच्या तोंडचे पाणी पळवले ; षटकारासह पडला चौकाराचा पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

