Share

पाकिस्तानात आलिशान हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, चिनी राजदूताला मारण्याचा होता डाव ?

Published On: 

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात हिंसक कारवाया मोठ्याप्रमाणावर वाढत आहेत.यातच आता पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा शहरात आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार लोक ठार आणि अकरा जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी तालिबानींनी हा हल्ला केल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानमधील चिनी राजदूत नोंग रोंग हे या हल्ल्याचं लक्ष्य असल्याचा संशय आहे. या हॉटेलमध्ये स्फोटकांनी भरलेल्या कारचा स्फोट झाला, त्यावेळी नोंग रोंग हे एका कार्यक्रमात होते आणि ते हॉटेलमध्ये नव्हते,असं पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी सांगितलं.

गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या सीमेजवळील आदिवासी भागात हल्ले वाढवले असून त्यांना उर्वरित पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे आणि त्यांनी या भागातल्या पायाभूत सुविधांच्या चीनी प्रकल्पांना विरोध दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!