Share

शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे लग्न करू इच्छिणाऱ्या मंडळींची होणार पंचाईत, जाणून घ्या नवी नियमावली

Published On: 

मुंबई – महाराष्ट्र राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले. गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आज रात्री आठ वाजल्यापासून येत्या 1 मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. जीवनावश्यक वस्तू, फळे, भाजीपाला आदीची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरु राहतील.

दरम्यान, नव्या नियमावलीनुसार, लग्न सोहळ्यांना केवळ 25 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. एवढंच नाहीतर विवाह सोहळा केवळ दोन तासांत आटपावा लागणार आहे. तसेच लग्नसोहळ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या नियमांपैकी कोणत्याही नियमांचं जर उल्लंघन झालं तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा नियमांचा भंग करणाऱ्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

संबंधित कार्यालय किंवा समारंभस्थळावरही कारवाई करण्यात येणार आहे. कार्यालयानं नियमभंग केल्यास कोरोना आपत्ती असेपर्यंत कार्यालय बंद करण्यात येईल. दरम्यान, आधी लग्नसोहळ्यांसाठी 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा होती. पण आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्नसोहळा उरकावा लागणार आहे.

दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,महानगरपालिकांची परिवहन सेवा, रिक्षा या सारख्या सेवाही सुरु असतील. मुंबईतील रेल्वे सेवासुद्धा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तात्काळ उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठीच सुरु राहील. खासगी वाहनंसुद्धा पन्नास टक्के क्षमतेनं चालवता येतील. मात्र फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांचा वापर करता येईल. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही केवळ नातेवाईकांचं आजारपण किंवा अंत्यसंस्कार या कारणांसाठीच दुसऱ्या शहरात जाता येईल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!