🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यावर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला तिसरी कसोटी जिंकणे महत्वाचे आहे.
यादरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतून जोस बटलर ने माघार घेतली आहे. कारण त्याची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे. याकाळात पत्नीसोबत राहण्यासाठी त्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासह भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अखेरच्या कसोटी सामन्यातून तो माघार घेऊ शकतो. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तिसऱ्या कासोटीपूर्वी इंग्लंड संघाने संघात तीन बदल केले. सलामीवीर डॉमिनिक सिब्ले ल संघाबाहेर करत डेविड मलनला संघात सामावून घेतले. मात्र जर मालिकेतील पुढील सामन्यातून जोस बटलर ने माघार घेतली तर इंग्लंडच्या अडचणीत अजून वाढ होऊ शकते. आधीच कर्णधार जो रूट वगळता इंग्लंडचे इतर खेळाडू मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘….नाहीतर टीम इंडिया मालिकेत २-० ने पुढे असती’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उपटले जो रुटचे कान
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- ‘मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अर्थकारणाचा विषय ; त्वरित सर्व मंदिरे उघडा’
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..


