मुंबई: भारत निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.राऊत यांनी आता थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात सत्ता दिल्यास कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही.
प्रतिथयश इंग्रजी दैनिक ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे. यात आपण काय करु शकतो? दरम्यान, बिहार निवडणुकीवर आपले लक्ष असून राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाल्यास मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- महाविकासआघाडी सरकारने शरद पोंक्षे यांना विधान परिषदेत पाठवू नये- सचिन खरात
- मोबाइलला नेटवर्क नाही म्हणून त्यांनी गावच काढले विकायला !
- संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’
- शेतकरी कायद्यामागील मोदी सरकारचा हेतूच शंकास्पद : पाटील
- जाणून घ्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येत खरच घट होत आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

