🕒 1 min read
मुंबई- केंद्रातील मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी कायद्याविरोधातील लढा तीव्र करत काँग्रेसने काल राज्यभर सत्याग्रह आंदोलन केले. मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी हे काळे कायदे तयार करण्यात आले आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावले जाणार आहेत म्हणूनच त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी उभा आहे. शेतकऱ्यांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसचा हा संघर्ष आहे. मोदी सरकारचा या कायद्यामागील हेतूच स्वच्छ नाही, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काल राज्यभर किसान अधिकार दिन पाळत सत्याग्रह आंदोलन केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथे सत्याग्रहाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, माजी मंत्री आ. रणजित कांबळे, माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशीष दुआ, बी.एम. संदीप, वामशी चंद रेड्डी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी सेवाग्राम आश्रमातील बापुकुटीत जाऊन प्रार्थना केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये सत्याग्रह करण्यात आला. प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे सत्याग्रह करण्यात आला. यासोबतच राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयीही काँग्रेस नेते, पदाधिकारी यांनी सत्याग्रह करून शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांना विरोध व्यक्त केला.शेतकरी विरोधी कायद्याविरोधातील आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकासआघाडी सरकारने शरद पोंक्षे यांना विधान परिषदेत पाठवू नये- सचिन खरात
- मोबाइलला नेटवर्क नाही म्हणून त्यांनी गावच काढले विकायला !
- संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’
- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान
- जाणून घ्या देशात कोरोना बाधितांच्या संख्येत खरच घट होत आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
