Share

महाविकासआघाडी सरकारने शरद पोंक्षे यांना विधान परिषदेत पाठवू नये- सचिन खरात

Published On: 

मुंबई : विधान परिषदेसाठी अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा सध्या आहे. हिंदुत्व आणि सावरकरांवरुन भाजप नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रांशी संबंधित १२ व्यक्तींची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस करायची आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही १२ नावे चर्चेअंती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या नावांत आयत्यावेळी बदल करण्याचे धोरण तिन्ही पक्षांनी अवलंबले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक नावावर सखोलपणे विचार करण्यात येत आहे.

दरम्यान, सावरकर मुद्द्यावरुन शरद पोंक्षे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी नेहमीच मतभेद राहिले आहेत त्यामुळे शरद पोंक्षे हे नाव महाविकासआघाडीतील राष्ट्रावादी आणि काँग्रेसला चालणार आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.

दरम्यान, विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवसेनेने अभिनेते शरद पोंक्षे यांची निवड करू नये, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली. अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य शरद पोंक्षे यांनी मध्यंतरी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करत सचिन खरात यांनी महाविकासआघाडी सरकारकडे पोंक्षे यांना विधान परिषदेत न पाठवण्याची मागणी केली आहे.Tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!