मुंबई: भाजप नेते माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.या टीकेत त्यांनी चक्क संजय राऊत यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा देखील केली आहे.
संजय राऊत हे पुणे श्रमिक पत्रकार संघात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नाला उत्तरे दिली.एका प्रश्नाला उत्तर देतांना राऊत म्हणाले की “महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे.यावर प्रचंड मोठे वादंग उभे राहिले होते.
याच मुद्य्याला धरून राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे:
शिवसेनेतल्या एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली… संज्याचा पुढचा चित्रपट ‘एक शिवसेना थी’
शिवसेनेतल्या एका रंगीला मुळे शिवसेनेची उलटी दौड सुरू झाली… संज्याचा पुढचा चित्रपट 'एक शिवसेना थी' |
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 1, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

