🕒 1 min read
पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.
अशातच, राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. EWS आरक्षण मराठा समाजाला दिल्यानंतर देखील मराठा समाजातील नेते यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनीEWS आरक्षण मराठा समाजासाठी लागू करण्यात यावा यासाठीच्या शासन निर्णयात चुका झाल्याचं निदर्शनास आणलं आहे. ‘EWS च्या जीआरमध्ये अनेक चूका आहेत, त्या त्वरित दूर कराव्यात’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर, राज्य सरकारमधील मंत्र्यांनी EWS चा मराठा समाजाला नोकर भरती व शिक्षकांत फायदा होणार असल्याचं सांगितलं होतं. यावर देखील त्यांनी प्रश्न निर्मण केला आहे. ‘नोकरी आणि शिक्षण मध्ये कसा फायदा होणार हे स्पष्ट करावं’ अशी मागणी देखील मेटेंनी यावेळी केली आहे.
‘पवार साहेब, ओबीसी-मराठा समाजातील वाद तुम्हाला बघायचा आहे का ?’
‘वडेट्टीवार हे सरकार मध्ये राहून भांडण लावतायत आणि सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. वडेट्टीवार पुढे चालले म्हणून भुजबळ साहेबांनी यात उडी मारली. त्यामुळेच त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली जातेय.’ असा खुलासा करत मेटेंनी या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणचं समर्थन केलं. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना वेळीच मध्यस्थी करावी असा इशारा दिला आहे. ‘उद्धव साहेब तुम्हाला हेचं करायचंय का? आणि पवार साहेब तुम्हाला बघायचं आहे का ?’ असा सवाल विनायक मेटे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- पुणेकरांनो, ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठीचे महत्वाचे ‘हे’ दहा नियम पाळाच; अन्यथा…
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- आता उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेसला देणार मैत्रीची हाक?
- केंद्रीय मंत्र्यांनीही घेतला शेतकरी आंदोलनातील लंगरमधील भोजनाचा आस्वाद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
