Share

राजा उदार झाला हाती भोपळा दिला ; मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळेआरोग्य सेवा देखील अपरूया पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. सध्या राज्यात वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यात संपूर्ण लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.

याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात रात्री ८ पासून कलम १४४ लागू करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये संचार बंदी यानिम्मिताने मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली आहे. या कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची रोजी मंदावणार आहे परंतु त्यांची रोटी मी थांबू देणार नाही असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जनतेला दिलेला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयावर आता विरोधी पक्षातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपचे नेते व प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. ‘राजा उदार झाला हाती भोपळा दिला आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा हा अर्थ महाराष्ट्रातील मोठा वर्ग महाराष्ट्रात उद्या पासून सुरू होणाऱ्या लॅाकडाऊन मुळे बाधित होणारं आहे. मात्र मदतीचा देखावा केला तरी तुटपुंज्या मदतीत हा वर्ग वंचित रहाणार आहे.’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी हि टीका केलेली आहे.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, १ किलो तांदूळ १ महिन्यासाठी मोफत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली आहे. तसेच नोंद केलेले लाभार्थी ७ कोटी आहेत. या सर्वांना १ महिना ३ किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत देणार आहे. तसेच शिवभोजन थाळी १० रुपयात यापूर्वी मिळत होती. ही योजना कोरोना काळात ५ रुपयात केली होती. परंतु आता हि शिवभोजन थाळी गोरगरिबांना मोफत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दिलेली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!