मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
दरम्यान, फक्त निर्बंध लागू करून कोरोना नियंत्रणात येणार नसल्याने आरोग्य सेवेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे असूनही सध्याच्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यांचा देखील गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली असून इतर राज्यातून ऑक्सिजन साठा देण्याची मागणी केली. त्यांनी ती मागणी मान्य केली आहे.
मात्र, दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेक द चेन : राज्यात उद्यापासून पुढचे पंधरा दिवस आणखी कडक निर्बंध !
- NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली का केली ?; मुश्रीफांचा सवाल
- …तेव्हा पक्षापेक्षा शेतकरी महत्वाचा असतो; बच्चू कडूंनी सांगितली भारतनानांची आठवण
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

