पंढरपूर : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भारत सरकारच्या आदेशानुसार ही निवडणूक लागल्याने ती पार पडावीच लागेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. आजच्या संबोधनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
पंढरपूरमधील निवडणूक पार पडेपर्यंत राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक पार पडताच तिथे देखील कडक निर्बंध लागू होतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ब्रेक द चेन : राज्यात उद्यापासून पुढचे पंधरा दिवस आणखी कडक निर्बंध !
- NIAच्या IG शुक्लांची तडकाफडकी बदली का केली ?; मुश्रीफांचा सवाल
- …तेव्हा पक्षापेक्षा शेतकरी महत्वाचा असतो; बच्चू कडूंनी सांगितली भारतनानांची आठवण
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन ; कोरोन संसर्गानंतर आदित्य ठाकरेंचा विश्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

