Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळेआरोग्य सेवा देखील अपरूया पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. सध्या राज्यात वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यात संपूर्ण लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.

याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. उद्या रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात रात्री ८ पासून कलम १४४ लागू करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये संचार बंदी यानिम्मिताने मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली आहे. या कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची रोजी मंदावणार आहे परंतु त्यांची रोटी मी थांबू देणार नाही असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जनतेला दिलेला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयावर आता विरोधी पक्षातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून ठाकरे यांच्या भाषणावर टोला लगावला आहे. ‘ मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते?’ अशा आशयाचे ट्वीट करून भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलेले आहे.

दरम्यान, पंढरपूरमधील निवडणूक पार पडेपर्यंत राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक पार पडताच तिथे देखील कडक निर्बंध लागू होतील अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, उद्या रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवस १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!