Share

डॉक्टरच खरा देवदूत, उद्‌घाटनापूर्वीच हॉस्पिटल दिले कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. देशात देखील कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शासकीय रुग्णालयांची कमतरता असल्याने रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करून खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी सर्वसामान्यांवर उपचार होणाऱ्या रुग्णालयांमध्ये बेड नाही, हे ओळखून व सामाजिक जाणिवेतून सोलापूरच्या एका डॉक्‍टराने त्यांच्या नव्याने उभारलेले सहा मजली हॉस्पिटल, ज्याचे अजून उद्‌घाटनही झाले नाही, ते कोरोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहे. कोरोना संकट काळात दाता ठरलेल्या या डॉक्‍टरांच्या दिलदारपणाचे सर्व स्तरांतून कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

अमजद सय्यद असे या डॉक्‍टरांचे नाव असून, ते हृदयरोग तज्ज्ञ आहेत. सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात त्यांनी नव्याने ‘नोबेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ नावाने सहा मजली हॉस्पिटलची उभारणी केली आहे. त्याचा सेटअप अजून सुरू आहे. मात्र, सध्याची कोरोनाची स्थिती पाहता व हॉस्पिटल व बेड मिळत नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय पाहता, या दवाखान्याचे शानदार उद्‌घाटन करण्याचे बाजूला ठेवून त्यांनी आपले रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाला दिले आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये २५ ऑक्‍सिजनचे बेड तयार असून, त्या सर्व बेडवर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!