Share

ब्रेक द चेनच्या वेळांमध्ये जिल्हा प्रशासनाने केलेत ‘हे’ बदल

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्‍हणून ब्रेक द चेन अंतर्गत १६ एप्रिल रोजी आदेश काढले होते. या आदेशामधील काही सेवांच्या वेळांमध्ये आता बदल करण्यात आला असून बदल करण्यात आलेल्या सेवा वगळता मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. हे आदेश २० एप्रिल २०२१ पासून १ मेपर्यंत लागू राहतील.

या आदेशातील सर्व बाबी या संपुर्ण औरंगाबाद जिल्‍हयासाठी लागू राहतील. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ वि‍क्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने, सर्व चिकन, मटण, अंडी, मासे, दुकाने, कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी अवजारे व शेतातील उत्‍पादने, पाळीव प्राण्‍यांच्‍या खाद्यांची दुकाने व पावसाळी हंगामासाठी लागणा-या वस्‍तुंची विक्री करणारी दुकाने व संस्‍था या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू राहतील. दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहिल.

१६ एप्रिलच्या आदेशान्वये मुस्लीम बांधवांचा रमजान महिना लक्षात घेऊन दुध व फळे विक्रीसंबंधी दुकाने पहिल्या टप्प्यात सकाळी ७ ते १ व दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. मात्र त्याऐवजी सदरची वेळ पहिल्या टप्प्यात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत व दुसऱ्या टप्पया सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत या कालावधीत दुकाने चालु ठेवण्यास परवानगी राहिल.

सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत घरपोच मद्य विक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्रीची दुकाने उघडुन किंवा पार्संल पध्दतीने दुकानातुन ग्राहकांस विक्री करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानास भेट देता येणार नाही. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) याच्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!