🕒 1 min read
मुंबई : गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. मात्र या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे एकाही चेंडुचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे सामन्याचा पहिला दिवस पुर्णपणे वाया गेला.
यानंतर दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला होता मात्र केवळ 64 षटकांचा खेळ झाल्यांनतर अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबविण्यात आला. यानंतर क्रिकेट रसिकांना सामन्याइतकिच उत्सुकता साउथहॅम्टन येथील हवामानाचे अपडेट घेण्याची लागली आहे. क्रिकेट रसिकांची ही मागणी पुर्ण करण्यासाठी भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक पुढे सरसावला आहे. आज रविवारी 20 जुन रोजी दिनेश कार्तिकने साउथहॅम्पटन येथील हवामानाचे अपडेट देणारे ट्विट केले आहे. तसेच या ट्विटमध्ये कार्तिकने कॅप्शनमध्ये स्वत:ला ‘तुमचा आवडता वेदर मॅन मीस्टर डिके’ असे संबोधले आहे.
Your lovely weather man Mr. DK ????#WTCFinal pic.twitter.com/4r4DOfaRaE
— DK (@DineshKarthik) June 20, 2021
दिनेश कार्तिक हा डब्ल्युटीसी अंतिम सामन्याच्या समालोचक टीमचा एक सदस्य म्हणून इंग्लंडमध्ये गेला आहे. 2019 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर दिनेश कार्तिक हा भारतीय संघाच्या बाहेर आहे. इंग्लंडमध्ये येण्यापुर्वी त्याने आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा बोलून दाखवली. यादरम्यान तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडुन खेळत असतो. मधल्या काळात त्याच्याकडे केकेआर संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र अपेक्षीत यश न आल्याने त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- रोहित आणि गील यांनी रचली 10 वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी
- साऊथम्पटनमधील पिचवर ‘हा’ स्कोअर पुरेसा ; टीम इंडियाच्या कोचचं भाकीत
- गिलला बॉल लागताच सिराजने केले असे काही ; होत आहे कौतुक
- ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’
- ‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
