नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 60,000 पेक्षा जास्त चालू खाती बंद केली आहेत. काही सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्याकडील करंट अकाउंट्स बंद करण्यास सुरुवात केली आहे. बँकेने ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना बँकांनी लाखोंच्या संख्येत करंट अकाउंट बंद केली आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे MSME आणि छोट्या व्यावसायिकां समोर अडचणी निर्माण होणार आहेत.
RBI ने दिलेल्या निर्देशात म्हटलं की, बँकेने त्या ग्राहकांचं करंट अकाउंट त्यांच्या बँकेत उघडू नये ज्यांनी दुसऱ्या बँकेतून कर्ज घेतले आहे. काही ग्राहकांनी एका बँकेकडून लोन घेऊन आणि मग दुसऱ्या बँकेत करंट अकाउंट उघडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरबीआयने असे निर्देश दिले आहेत. यावर निर्बंध आणण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. फसवणूकच्या प्रकारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

