Share

खुशखबर! आता औरंगाबादहून फक्त ९१५ रुपयात करा हवाई सफर

Published On: 

औरंगाबाद : कोरोनामुळे बंद असलेली असलेली इंडिगो सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. या विमानाचे आता दररोज उड्डाण होत आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या सुविधेत मोठी भर पडली आहे. कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इंडिगो कंपनीने आपल्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी केवळ ९१५ रुपयांपासून पुढे तिकीट बुकींगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

इंडिगो एअरलाइन्सने ४ ऑगस्टला इंडियन एव्हिएशनमध्ये पंधरा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. देशातील सर्व विमानतळावर १५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. इंडिगो एअरपोर्टचे व्यवस्थापक अनिरुद्ध पाटील, विमानतळ निर्देशक डीजे साळवे, पवन कुमार यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. ५ फेब्रुवारी २०१९ औरंगाबाद येथे इंडिगोने प्रवास सुरू केला आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद सारख्या विविध शहरांमध्ये फ्लाईट ऑपरेशन सुरू केले.

कोरोना काळातही सेवा वाढविण्यात यशस्वी ठरली आहे. इंडिगोने सुरु केलेल्या ऑफर्सचा फायदा ६ ऑगस्ट पर्यंत घेता येणार आहे. या ऑफर अंतर्गत केवळ ९५० रुपयात विमान प्रवास करता येईल. प्रवासी १ सप्टेंबर २०२१ ते २६ मार्च २०२२ या दरम्यान स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकतात. यात ग्राहकांना एचएसबीसी क्रेडिट कार्डवर अधिक सवलत मिळेल. तसेच ग्राहकांना ५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. प्रवासी आगरताळ, आग्रा, अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, बंगळुरू, बेळगाव, विशाखापट्टनम आदी ठिकाणी प्रवास करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!