Share

‘त्या’ दलित मुलीच्या अत्याचार प्रकरणी पंतप्रधान मोदी गप्प का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुधवारी दिल्लीमध्ये ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली. मुलीच्या आई -वडिलांच्या म्हणण्या नुसार, ती रविवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास दिल्लीच्या जुन्या नांगल भागात त्यांच्या घरासमोर असलेल्या स्मशानभूमीत कूलरमधून थंड पाण्या आणण्यासाठी गेली होती. त्या नंतर ६.०० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीतील पुजाऱ्याने तिच्या आईला तिचा मृत देह देखावला आणि सांगितले की पाणी भरताना तिला कोलारमुळे विजेचा झटका बसला. तिच्या डाव्या मनगटात आणि कोपरात जळण्याच्या खुणा होत्या आणि तिचे ओठही निळे होते.

या प्रकरणी अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या, पिडीत कुटुंबाची भेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी घेतली. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पिडीत कुटुंबाची भेट घेतली. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणले, ‘भारतीय मुलींच्या मेडल्सचं श्रेय घेणारे मोदीजी. ९ वर्षांच्या लहानगीच्या बलात्कारावर गप्प का?’ अशी खोचक टीका जगपात यांनी केले आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर राजकीय वादंग निर्माण होताना दिसत आहे. काँग्रेसच्या राज्यात बलात्कार होत नाही का? असं भाजपवाले म्हणत आहेत. काँग्रेसने प्रत्युतर देत म्हंटले, आमच्या राज्यात बलात्कार होतात म्हणून तुमच्या राज्यातील बलात्कार माफ करायचे का?, असा काँग्रेसने भाजपला सवाल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!