Share

तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे – मलिक

Published On: 

मुंबई  – केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही त्यांची भूल आहे… शेतकरी कधीही थकणार नाही… त्यामुळे वेळ गेलेला नाही. चर्चा करा… कायदे रद्द करा… असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

देशात तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा सुरुवातीपासून आहे. परंतु भारत बंदला आवाहन केले आहे मात्र याबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. याबाबत पक्षातंर्गत चर्चा करुन त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय होईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबाबतची भूमिका शेतकऱ्यांची आहे त्याला सुरुवातीपासून पाठिंबा राहिलेला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत ही भूमिका पक्षाची आहे.नवीन कायदा करण्याचा अधिकार सरकारला असतो. लोकांना विश्वासात घेऊन कायदा केला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. कायदा बदलून नवीन कायदा करता आला असता पण आम्ही एक पाऊल मागे घेणार नाही ही मोदीसरकारची भूमिका राहिली आहे त्यामुळे शेतकरी आंदोलन लांबले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!