काबुल – तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आता नियंत्रण मिळवल्यानंतर सरकार स्थापन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते. या दोघांनाही तझाकिस्तानमध्ये पळ काढल्याचं सांगण्यात येतं. एनआरएफच्या नेता असणाऱ्या मसूदने पंजशीरमध्ये अजूनही युद्ध सुरु असल्याचा दावा केलाय.
दरम्यान,एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूलाअफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याचं नाव जवळजवळ निश्चित केलं आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांना देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी बसवलं जाणार आहे असं सांगण्यात येत आहे.
दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे. सिराजुद्दीन हक्कानीकडे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात येणार आहे. हक्कानीच सर्व राज्यपालांची नावं निश्चित करणार आहे.परराष्ट्र मंत्रलायाचं नेतृत्व मुल्ला अमीर खान मुत्ताकींकडे सोपवण्यात येणार आहे अशी देखील माहिती समोर येत आहे.
तालिबानचा प्रवक्ता जबी उल्ला मुजाहिद याने ‘पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन केले जाईल’, असे सांगितले आहे.’आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना स्वीकार होईल, असे सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे’, असे तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- सरकार स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानकडून ‘या’ देशांना देण्यात आले आमंत्रण
- अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईडीकडून ८ तास चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
