मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबाच्या संसाराचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषानुसार मदत मिळावी या मागणीसह पुरासंबंधित अन्य काही मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा करत राज्य सरकारविरोधात जल समाधी आंदोलन पुकारले होते.
या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मुंबईत भेटायला बोलावले होते. आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमधील बैठक पार पडली असून शेट्टींनी याबाबत माहिती दिली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी 2019 च्या धर्तीवर मदतीची घोषणा केली होती. पण अद्याप शासननिर्णय झालेला नाही. त्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करुन शासननिर्णय घेऊन असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,’ असं भाष्य शेट्टी यांनी केलं.
पुढे ते म्हणाले, ‘नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचं सरकारनं सांगितलं होतं. आता शेतकरी अडचणीत असताना ते पैसे तातडीने द्यावे अशी आमची मागणी होती. सरकारनं ती घोषणा केली आहे. त्यापासून शासन दूर जाणार नाही. पण सरकारवर सध्या आर्थिक संकट असल्यामुळे जुळवाजुळव सुरु आहे. शेतकऱ्यांना नक्की मदत देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.’ असं देखील शेट्टी म्हणाले.
‘कायमच पुराचा धोका उद्भवणाऱ्या गावांचं विनाअट पुनर्वसन करा’
पूरग्रस्तांचं विनाअट पुनर्वसन करावं. चिखली हे सर्वाधिक पूरग्रस्त गाव आहे. या गावातील ग्रामस्थ माझ्यासोबत आले आहेत. या चिखलीतील नागरिकांना 1989 रोजी गावाचं स्थलांतर करायचं म्हणून भूखंड दिले होते. या भूखंडाचे प्रॉपर्टी कार्ड सरकारच्या नावावर आहे. पण गेल्या 32 वर्षात ही जागा गावकऱ्यांच्या नावावर करण्यात आलेली नाही. पुनर्वसनाचे वाईट अनुभव आहेत. त्यामुळे सरकारने आयएस दर्जाचा अधिकारी नेमून प्रश्न निकाली लावावेत, अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘उद्या तोच भगवा मुंबई महापालिकेवर फडकणारच’; नितेश राणेंचा विश्वास
- महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली; पुण्यात १४ वर्षीय मुलीवर आठ नराधमांनी केला बलात्कार
- ‘तुमची औकात काय आणि बोलता किती!’, राणेंची राऊतांसह शिवसेनेवर खोचक टीका
- हृतिक चा ‘फायटर’ लवकरच ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
- ‘एक अजनबी हसीना से…’; शशी थरूर यांच्या गाण्याला रसिकांचा जोरदार प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

