Share

सरकार स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानकडून ‘या’ देशांना देण्यात आले आमंत्रण

Published On: 

काबुल – तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर आता नियंत्रण मिळवल्यानंतर सरकार स्थापन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते. या दोघांनाही तझाकिस्तानमध्ये पळ काढल्याचं सांगण्यात येतं.

दरम्यान, एनआरएफच्या नेता असणाऱ्या मसूदने पंजशीरमध्ये अजूनही युद्ध सुरु असल्याचा दावा केलाय. एकीकडे हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने ‘पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन केले जाईल’, असे सांगितले आहे.’आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना स्वीकार होईल, असे सरकार स्थापन करण्याचा तालिबानचा प्रयत्न आहे’, असे तो म्हणाला.

या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी तालिबानने रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, कतार आणि तुर्कस्तान या देशांना आमंत्रित केले आहे. या देशांनी यापूर्वीच तालिबानशी संपर्क साधला आहे. रशिया, चीन, पाकिस्तान ,कतार आणि तुर्कस्तान यांनी अफगाणिस्तानातील त्यांचे दूतावास बंद केलेले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!