मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ पार्टीवर केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा कारवाई दरम्यान अटकेत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या संदर्भात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहणार असल्याचं बोललं जात आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडचे चुकीचे आणि बदनामीकारक चित्र रंगवले जात आहे. याकडे लक्ष वेधणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहेत. त्याबाबतची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर दिली आहे.
क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीच्या रडारवर बॉलिवूडमधील कलाकार आले आहेत. त्या प्रकरणी होत असलेल्या कारवाईमुळे बॉलिवूडचे नकारात्मक चित्र उभे राहत असल्याबद्दल त्या भेटींमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. बॉलीवूड हा मोठा उद्योग आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यांचे उपजीविकेचे साधन धोक्यात येऊ शकते. त्या बाबींचा विचार करून मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांना पत्र पाठवणार आहेत, असे मलिक यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप
- तेजस्विनीच्या बोल्ड फोटोवर ‘खल्लास…’म्हणत चाहत्यांनी दिली पसंती
- मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले
- राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मानहानीचा गुन्हा दाखल केल्यानंतर शर्लिनने दिले प्रत्युत्तर
- संभाजी राजेंच्या मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्याचे सोलापूरात उत्साहात स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

