Share

अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले! पोलिसांच्या कारवाईला वेग 

Published On: 

औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणा-याविरूध्द पोलिसांनी धडक कारवाई करीत पोलिसांनी ९ हजार ६६० रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. कडक निर्बंधात पोलिसांच्या कारवाईला चांगलाच वेग आला आहे.

सचिन शेषराव खरात (रा.मुकुंदवाडी, संतोषी मातानगर), कांतीलाल गोसावी (रा.गणेशनगर, पुंडलिकनगर), गजानन भालचंद बत्तीसे (रा.सातारा गाव) अशी अवैधरित्या देशी-विदेशी दारू विव्रेâत्यांची नावे आहेत. तिघांविरूध्द अनुक्रमे मुकुंदवाडी, पुंडलिकनगर आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये पोलिसांची चांगलीच भीती निर्माण झाली आहे. सध्या शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. विशिष्ठ वेळेत दारूची दुकाने बंद होत असल्यामुळे तळीरामांना चढ्या भावात दारू विक्री करण्याचे प्रमाण देखील वाढले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!