मुंबई : काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज रविवारी निधन झाले. अवघ्या ४६ व्या वर्षी राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. राजीव सातव यांची संसदेत ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. भाजपचे नेते तथा केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही दु:ख व्यक्त केलेय. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘आज सकाळी राजीवजी सातव यांच्या दुःखद निधनाची बातमी कळाली. मनाला अत्यंत वेदना झाल्या. आज ते आमच्यामध्ये नाहीत, त्यांच्या जाण्याने केवळ कॉग्रेस पक्षाचीच हानी झाली असे नाही तर आमच्या मित्रपरिवाराची पण फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे’.
आज सकाळी राजीवजी सातव यांच्या दुःखद निधनाची बातमी कळाली. मनाला अत्यंत वेदना झाल्या.
आज ते आमच्यामध्ये नाहीत, त्यांच्या जाण्याने केवळ कॉग्रेस पक्षाचीच हानी झाली असे नाही तर आमच्या मित्रपरिवाराची पण फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. pic.twitter.com/ZcXASPE84t
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) May 16, 2021
राजकीय प्रवास
राजीव हे काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी पुण्यात फर्गुसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेले आहे. त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव डॉक्टर आहेत. २००९ ते २०१४ या काळात राजीव सावत हिंगोलीचे आमदार होते. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे ते २००८ ते २०१० या काळात अध्यक्ष होते. तर २०१० ते २०१४ या काळात त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेले आहे.
राहुल गांधींचे ‘जिवलग’
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना सभा घेतली होती. २०१४ च्या मोदी लाटेतही राजीव सातव हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे कॉंग्रेसचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते मानतात.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला’, मुख्यमंत्री ठाकरेंच्या भावना
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

