मुंबई : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर राजीव सातव यांना इतर आजारांनी ग्रासलं होतं. शनिवारी त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
त्यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ‘खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’ असे मुख्यमंत्री म्हणालेत.
खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2021
काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव हे कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांपासून आजारी होते. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने प्रकृती पुन्हा खालवली होती. न्यूमोनियासोबतच त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो हा नवा व्हायरस सापडला होता. मागील २३ दिवसांपासून राजीव सातव आजाराशी लढत होते. पण रविवारी त्यांची झुंज संपली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोकसंदेश व्यक्त केला आहे. ‘राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी माझा संसदेतील मित्र गमावला’, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

