मुंबई : काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनाने निधन झालं आहे. सातव यांच्या अचानक जाण्यामुळे राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून काँग्रेसमधील भविष्यातील आश्वासक नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया सर्वच राजकीय पक्षांकडून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शोकभावना व्यक्त केल्या आहेत. “महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे,” असं म्हणत पवार यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
‘काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रानं, देशानं एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. त्यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सोहार्दाचे संबंध होते. ते भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अपर्ण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’
- मोठी बातमी : कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन


