नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे आज रविवारी निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. अवघ्या ४६ व्या वर्षी राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची संसदेत ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोकसंदेश व्यक्त केला आहे. ‘राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.
Anguished by the passing away of my friend from Parliament, Shri Rajeev Satav Ji. He was an upcoming leader with much potential. Condolences to his family, friends and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘मी माझ्या मित्राला गमावले. राजीव सातव यांच्या निधनामुळे मी फार दु:खी आहे. ते कॉंग्रेसच्या आदर्शांना प्रत्यक्षात उतरवणारे एक नेते होते. त्यांच्याकडे प्रचंड क्षमता होती. त्यांचे जाणे हे आपल्या सर्वांसाठी फार मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त करतो,’ अशा भावना राहुल गांधींनी व्यक्त केल्यात.
‘महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे’, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त!’, शरद पवारांच्या शोकभावना
- असाध्य ते साध्य! राजीव सातव यांचा हिंगोली ते दिल्ली राजकीय प्रवास
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

