Share

‘कावळ्यांची पिसं झडून जातील, चोची मारून तुटून जातील, पण सरकार कोसळणार नाही’

Published On: 

नाशिक : सरकार पाडण्याची वल्गना भाजपकडून वारंवार केली जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला या मुद्द्यावरुन डिवचलं आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा असं सांगतानाच तरही हे सरकार काही पडणार नाही, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दिल्लीत मी जिथे राहातो. त्या ठिकाणी डोमकावळे आहेत. याबरोबर येथे काही चांगल्या प्रकारचे मोर सुद्धा आहेत. काही वेळा माझ्या आजूबाजूला मी डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचे सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. कुणी कितीही फडफड आणि बडबड करू द्या त्या कावळ्यांची पिसे झडून जातील, चोची तुटून जातील. पण हे सरकार मजबूत राहील, अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांना सुनावले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे. येथे तुळशीचे पीक जास्त आहे. मात्र, काही लोकांना वाटते की येथे गांजा, भांग आपण पिकवू, पण ते शक्य नाही. ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचे घाव तुम्ही किती करणार आहात? मी मागेच म्हणालो होतो, की यातूनही सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच बाकी राहिली आहे, तेव्हढ एकदा करा, बाकी सगळे झाले. अश्या शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!