मुंबई : साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका त्यांनी केली होती. कांचनगिरी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलेलं आहे. परप्रांतियांचा प्रश्न उभा करत उत्तर भारतीयांना मारायचं, बिहारी लोकांची सालटी काढायची हे धंदे राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाच्या स्वार्थासाठी केलं आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत यांच्या या टीकेला आता मनसेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.
सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे, त्यामुळे तुमच्यातला जरासंधचा उभा चिरून वध करणं आम्हाला सहज शक्य आहे…
तोपर्यंत तुम्ही कधी भाजप बरोबर, तर कधी काँग्रेस बरोबर युत्या, आघाड्या करून श्रीखंड खात रहा… लवकरच रणशिंग फुंकल जाईल! #पाखंडी_राऊत— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) October 22, 2021
‘सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे, त्यामुळे तुमच्यातला जरासंधचा उभा चिरून वध करणं आम्हाला सहज शक्य आहे. तोपर्यंत तुम्ही कधी भाजपाबरोबर, तर कधी काँग्रेसबरोबर युत्या, आघाड्या करून श्रीखंड खात रहा, लवकरच रणशिंग फुंकल जाईल’, असा इशारा देखील अखिल चित्रे यांनी दिला आहे.
सत्तेचे श्रीखंड खाण्यासाठी सदैव लाचार, युती-आघाडी करणाऱ्या पाखंडींने पौराणिक संदर्भ देणे हास्यास्पद.. @Vinayakrauts
या युगातील सेनेचे ‘शिखंडी’ तर तुम्हीच,म्हणून तर तुम्हाला पुढे केले जात आहे. #पाखंडी_राऊत— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) October 22, 2021
महत्वाच्या बातम्या
- संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये; भाजपच्या उपाध्यक्षांचा अजब सल्ला
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- ‘पुणे मनपा हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

