Share

औरंगाबादेत प्रत्येक वॉर्डात पालक अधिकारी; आतातरी समस्या सुटतील का चुटकीसरशी?

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय राज आहे. नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी कोणाकडे जावे हा प्रश्न निर्माण होत होता. मात्र आता यावर महापालिकेने तोडगा काढला आहे. नागरिकांना आपल्या समस्यांबाबत तक्रार मांडण्यासाठी महापालिकेच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही. जवळच्याच प्रभाग कार्यालयात जाऊन आपल्या समस्यांबाबत माहिती देता येईल. एवढेच नव्हे तर या समस्यांवर तत्काळ उपाययोजनादेखील केली जाईल, अशी योजना औरंगाबाद महापालिकेतर्फे आखण्यात आली आहे.

औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या सूचनेनुसार शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. हे संबंधित प्रभागाचे पालक अधिकारी असतील. महापालिकेत आता ९ प्रभागासाठी ९ पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील विविध भागांत स्वच्छता, ड्रेनेज, पाणी, रस्ते, नालेसफाई यासंबंधीच्या तक्रारींची संख्या अधिक असते. या सोडवण्यासाठी आता प्रत्येक प्रभागात पालिकेच्या एका प्रमुख अधिकाऱ्याची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

प्रभागाच्या विविध वॉर्डातील प्राप्त होणाऱ्या समस्या व तक्रारींवर संबंधित भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही करून घेण्यावर लक्ष द्यावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे. यात कुणी कर्तव्यात कसूर करताना आढळल्यास त्यांच्यावर थेट आयुक्तांकरवी कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालक अधिकाऱ्यांना आपल्या वॉर्डांतील मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीवरदेखील लक्ष ठेवावे लागणार आहे.

प्रभागानुसार पालक अधिकारी

प्रभाग १ ए. बी. देशमुख
प्रभाग २ विजय पाटील, उद्यान अधीक्षक
प्रभाग ३ सौरभ जोशी, उपायुक्त
प्रभाग ४ संतोष टेंगळे, उपायुक्त
प्रभाग ५ डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य अधिकारी
प्रभाग ६ अ‍ॅड. अपर्णा थेटे, उपायुक्त
प्रभाग ७ एस.डी. काकडे, कार्यकारी अभियंता
प्रभाग ८ बी.डी. फड, कार्यकारी अभियंता
प्रभाग ९ संजय पवार, लेखाधिकारी

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!