नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.
याच दरम्यान काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या अनोख्या शैलीत एक खास ट्विट केलं आहे. शेतकरी आंदोलन आणि एकंदर परिस्थितीवर शेरोशायरीच्या अंदाजात नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाष्य केलं आहे. “श्रीमंताच्या घरातील कावळाही मोर दिसतो” असं ट्विटमध्ये म्हटलं असून त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक खास ट्विट केलं आहे. “श्रीमंताच्या घरातील कावळा देखील मोर दिसतो आणि गरीबाच्या घरातील मुलं तुम्हाला चोर दिसतात का?” असा थेट सवाल सिद्धू यांनी केला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच प्रत्येक जण सिद्धू यांच्या ट्विटचा अर्थ आपआपल्या मतांनुसार लावत आहे आणि त्याची प्रशंसा किंवा टीका करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धू यांनी याआधी देखील अनेकदा कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘हा देखील नेहमीप्रमाणे ‘शब्दाचा बुडबुडा’च ठरला’ सामनातुन केंद्र सरकारवर टीका !
- नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची चर्चा, विराट कोहलीने दिली माहिती
- टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट
- सचिनचा इंग्लंडला मदतीचा हात; सांगितला भारतीय फलंदाजांना बाद करण्याचा उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
