चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिला कसोटी रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर भारताची कामगिरी शानदार आहे. गेल्या 22 वर्षापासून टीम इंडिया या मैदानावर जिंकत आहे. परंतु या वेळी इंग्लंडचं भाराताला आव्हान असणार आहे.
दरम्यान, माजी भारतीय फलंदाज सचिन म्हणाला की, “जर जॅक लीचला भारतातील परिस्थितीत यशस्वी व्हायचे असेल; तर त्याला आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण करावे लागेल. मी त्याच्या गोलंदाजीचे फार बारकाईने निरीक्षण केले आहे. तो नेहमी एकाच गतीने गोलंदाजी करतो. जर त्याला खेळपट्टीवर टर्न मिळत असेल; तर चेंडू टाकण्याच्या वेगातही मिश्रण करणे श्रेयस्कर ठरेल. या गोष्टी केल्यास फलंदाजाला स्वत:ला सांभाळण्यास पुरता वेळ मिळत नाही. २०१२ साली मॉन्टी पानेसर आणि ग्रीम स्वान यांनी हीच योजना आखली होती आणि यश मिळवले होते.”
“याबरोबरच मला असे वाटते की, चेन्नईच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची भूमिकाही महत्त्वाची असेल. तसेच रिव्हर्स स्विंग गोलंदाजीही पाहायला मिळेल. माझ्या मते, १५ ते ६० व्या षटकापर्यंत चेंडू रिव्हर्स स्विंग होईल. यावेळी फलंदाजांच्या संकटात मात्र भर पडणार आहे,” असे पुढे बोलताना सचिनने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘हा देखील नेहमीप्रमाणे ‘शब्दाचा बुडबुडा’च ठरला’ सामनातुन केंद्र सरकारवर टीका !
- नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची चर्चा, विराट कोहलीने दिली माहिती
- टिकून राहायचे असेल तर भारताच्या ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करणे आवश्यक : रूट
- मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण दिवस; आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

