Share

गुन्हेगार सरकारचे जावई झालेत; साकीनाका प्रकरणावरुन नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Published On: 

मुंबई : साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज पीडित महिलेच्या दुःखद निधनाची बातमी मिळताच अखंड महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला या प्रकरणी धारेवर धरलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

आरोपींना हे समजलं आहे की, कोणत्याही प्रकारचे अत्याचार केल्यानंतर हे महाराष्ट्र सरकार वाचवतं. राज्य सरकार आपल्या लोकांना वाचवत असतं. आपल्या लोकांना संरक्षण देतं. घडलेल्या घटनांची, मंत्र्यांची नावे बघा, नेत्यांची नावे बघा. प्रत्येक बाबतीत वाचवलं गेलंय म्हणजे गुन्हेगारांना संरक्षणच झालं ना?, याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मुळात कायदा आणि सुव्यवस्था या लोकांच्या हातात राहिलेली नाही. म्हणून या वाढत्या घटना दिसत आहेत. मुंबईत मुख्यमंत्री, पुण्यात उपमुख्यमंत्री राहतात. या दोन्ही शहरात राज्याचे प्रमुख राहतात त्याच शहरात असे महिलांवर अत्याचार होत असतील, तर गुन्हेगार हे सरकारचे जावईच झाले आहेत, असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!