Share

उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी

Published On: 

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हिंदू विरोधी आहे. त्यामुळेच आधी ज्या गोविंदाचे आणि गणेश भक्तांचे स्वागत होत होते, त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होत आहे. आणि दुसरीकडे ज्याच्यावर आधीच घाणेरडे गुन्हे दाखल आहेत, तो उजळ माथ्याने मेळावे घेत आहे. कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी ज्या प्रमाणे गणेश भक्तांवर गुन्हे दाखल झाले, त्याच प्रमाणे महेबूब शेखवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष अॅड. माधुरी अदवंत यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना केली.

राज्यातील ठाकरे सरकारला जनाची नाही तर मनाचीही लाज राहिलेली नाही. त्यामुळे अत्यंत शिस्तीत सुरू असलेल्या गणेश भक्तांच्या मिरवणुकीवर गुन्हे दाखल केले जात आहेत. या आधी देखील गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल केले गेले. तर दुसरीकडे उजळ माथ्याने मेळावे घेणारा महेबूब शेख कार्यकर्त्यांची गर्दी  जमा करतोय. त्यामुळे ज्या प्रमाणे गणेश भक्तांवर गुन्हे दाखल केले, त्याच प्रमाणे महेबूब शेखवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपच्या वतीने अॅड. अदवंत यांनी केली आहे.

ठाकरे सरकारचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. सरकारला थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी सर्व गोविंदा आणि गणेश भक्तांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. नाही तर हाच नियम सत्तेत बसलेल्या पक्षांच्या नेत्यांनाही लावण्याची मागणी अॅड. उदावंत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!