Share

आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यासोबतच, आरोपीविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील लवकरात लवकर पावले उचलतील असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केलाय. ‘मुंबईत साकीनाकातील एका महिलेवर क्रूर बलात्काराची घटना अतिशय वेदनादायी आणि धक्कादायक आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी दिलीप-वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पावले उचलली जातील,हा विश्वास आहे,’ असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

साकीनाकामधील पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. साकीनाकामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी निशब्द आहे. राक्षसी पद्धीतीने महिलेवर झालेल्या अत्याचार झाला ते कुठे तरी थांबलं पाहिजे. माफ कर ताई, आम्हाला तू कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही, असं म्हणत भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ भावूक झाल्या. त्यांना या घटनेवर बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!